STORYMIRROR

Dinesh Kamble

Fantasy

3  

Dinesh Kamble

Fantasy

स्वप्नमालकी

स्वप्नमालकी

1 min
770


स्वप्नमालकी..

___________________

नेत्रे माझी असतांना.

तुझी चालते चालाखी...

रात्रभर स्वप्नांवर माझ्या

का तुझी स्वप्नमालकी...?


तू का रे सतावतो मला.?

असा वेड्यागत निशीदिनी..

तुझ्याविना नाही काही

शिल्लक माझ्या जीवनी..


स्वप्नातला तुझा खट्याळपणा

आता गडे तू आवरता घे..

बंद कर तू स्वप्नात येणं.

घेऊनी वरात माझ्या दारात ये..


स्वप्नमालकी हृदयाची दिली तुला मी

म्हणजेच तुझीच झालीय ना मी...

माझ्या मुखी असतो तुझाच मंत्रजाप.

आता कुठे रे राहिलीय माझी मी...


ऐक ना, माझ्या नकळत जरी मी

दिली तुला ही स्वप्नमालकी..

आर्जव माझा तुला पुन्हा पुन्हा

सजव आता तू सत्यातली पालखी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy