STORYMIRROR

manasvi poyamkar

Tragedy Romance

5.0  

manasvi poyamkar

Tragedy Romance

स्वप्ने माझी जाळली

स्वप्ने माझी जाळली

1 min
751


कोमेजली फुले सारी

प्रीत माझी माळली

उध्वस्त विश्वासघाताने

स्वप्ने माझी जाळली

नाही ही आपली वाट

नाही हा आपला थाट

सुखाच्या शर्यतीत हरलो

दुःख आज भाळली

सोडलीस तू साथ

अंतरी काहुल माजला

माझ्या भोळ्या प्रीतीचा अंत

तुझ्या घाताने केला

पाउले माझी मीच वळवुनी

खोटी प्रीत तुझी टाळली

तुझ्या उध्वस्त विश्वासघाताने

स्वप्ने माझी जाळली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy