स्वप्नातील अनोखी प्रीत
स्वप्नातील अनोखी प्रीत
शब्द ते अबोल होते ,
नात्यात सर्व गुंग होते
डोळ्यांची भाषा पुरेशी होती,
त्यात अनोखे प्रित होती .
सत्यातही स्वप्न दिसे ,
स्पर्शुनी जाता मोरपिसे ,
अलगद मनही फुले ,
कळत नकळत होत असे.
वेगळाच होता तो गारवा ,
जीवनातील स्वप्नांचा झोका.
झोका उंच उंच उडे,
काय सांगू कसे सांगू ?
कारण शब्द ते अबोल होते.

