स्वप्नाची मालिका..
स्वप्नाची मालिका..
स्वप्नांची दुनिया सारी,
भास नयनी मोतीयांचे,
भूल पडली गहिरी,
गुंतलेले मन स्वप्नात हे,!!
नयनांना सवयीचं होतं
मनला ओढ नव्याने
पुन्हा तीच वाट चुकले,
पुन्हा तीच गोष्ट घडते.!!
मन मोरपीसि स्वाप्नांत हरवले
रंगून त्यांसवे जग ही विसरले,
चंद्रासवे चांदण्या खेळीत लपंडाव
रात्रीचा हा प्रवास ,नवेच कथानक ,
पुन्हा आज घडते,,...!!
स्वप्नात होते मन पाखरु जणू ,
मोहरल्या क्षणचित्रं घेउनी ते
येते भानावरी मग मन
सोन किरणे करती जागे,..!!!
स्वप्नातली कथा लिहायला
अधिर मन पाही वाट निशेची ,..
चन्द्रचादंण्या नभी येण्याचं
अन मिटल्या पापण्यात,
स्वप्नातल जग पाहायचे,...!!!!!
असे हे भूलवे स्वाप्नांतले
जग हल्ली रोजच येते नयनी,
रोजच घटनाचा होतो प्रवास
न स्वप्नात लिहिली जाते मग
कल्पनाचे कथनाक,..स्वप्नांची मालिका,!!!!!!
