STORYMIRROR

Jayesh Madhav

Inspirational

3  

Jayesh Madhav

Inspirational

स्वप्न

स्वप्न

1 min
206

मी स्वप्नांच्या दिशेने चालतोय

अगदी अनवाणीपणे

गव्हाच्या दाण्यावरील दवबिंदू

सोनेरी किरणात चमकतोय तसा

कधीही नष्ट होईन तरीही न भिता...


माझं स्वप्न माझं आहे

ते मलाच जगायचं आहे

मी गेल्यानंतर ते अडगळीत जाईल

विसरून जाईल जग मला

आणि माझ्या स्वप्नांनासुद्धा...


क्षितिजापलीकडे, ढगांच्या आड

कुठेतरी लपून बसलंय

मर्यादेपलीकडे तरीही नजरेत ते रूतून बसलंय

पायात रूतलेल्या काट्यासारखे

आत आत सरकत..


घर खूप लांब आहे

माणसंही खूप दूर आहेत

पण आकाश खूप जवळ वाटतं

नजरेच्या टप्प्यात

अगदी माझ्या स्वप्नांसारखं...


उन्हाने तापलेल्या रस्त्याने..

वितळलेल्या डांबरावरून..

अलगद मार्गक्रमणाने

नक्कीच मी पोचेन

थेट माझ्या स्वप्नांपर्यंत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational