STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract

4  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract

स्वप्न

स्वप्न

1 min
442

रात्री गाढ झोपेत

पडतात ती पण 

स्वप्न असतात|

टक्क जागेपणी 

दिवसा मन:चक्षू ते

दिवास्वप्न बघतात||१||


झोपेत काय पाहावं|

आवाक्यात स्वप्न नसतं|

जागेपणी काय दिसावं|

आपण ठरवलेले असतं||२||


येईल ते निमूटपणे

झेलत असतो आपण|

ठरवून पूर्ण करायचं तर

खेळ नसतोच तो पण||३||


मनासारखी स्वप्न पूर्ण

फार थोड्यांची होतात|

स्वप्न पाहणारे भाग्यवंत

नाही येत कधी गोत्यात||४||


कुणासाठी असतात

स्वप्न फक्त रंजन|

तर कुणाच्या नयनी

वास्तवतेचं अंजन||५||


सुस्वप्न पूर्ण होणार असतील

तर त्याला जीवनात अर्थ उरतो|

नाहीतर नुसतीच ते जागेपणी

पापण्यांसाठी भार व्यर्थ ठरतो||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract