STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Inspirational

4  

Prashant Tribhuwan

Inspirational

स्वप्न

स्वप्न

1 min
284

जीवनाचे ध्येय  

मिळते ज्यातून  

जीवन जगणे 

शिकतो त्यातून...१


उडवून झोप 

जागेपणी दिसे 

देते संजीवन 

स्वप्न तेची असे...२


जगताना इथे 

वाटता निराशा 

स्वप्नच जागवे

हृदयात आशा ...३


स्वप्नच भरते 

जगण्याची आस 

कधी कधी होते 

ते देखील भास...४


स्वप्नात रमता 

सत्य न भुलावे 

वाट त्याच्यासाठी 

काटेरी चालावे ...५


करू स्वप्न पूर्ण 

अहोरात्र झटून 

त्याच्यासाठी आम्ही 

घेऊन डोळे मिटून ...६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational