स्वप्न
स्वप्न
प्रत्येक डोळ्यात असते स्वप्न
प्रत्येक मनात वसते स्वप्न
आकाशाला गवसणी घालण्याचे असते कुणाचे स्वप्न
जगावर आपले नाव कोरण्याचे असते कुणाचे स्वप्न
काहींची जरा वेगळी असतात स्वप्न
आपले बाजुला ठेवून दुसऱ्यांची पुर्ण करतात ते स्वप्न
आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न
जिवनात कायम पुढे रहाण्याचे
असते काही लोकांचे स्वप्न
पण डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न
तेव्हाच होतील पुरी
प्रयत्न,निश्चय,मेहनतीची जेव्हा साथ असेल त्याला खरी.
सर्व स्वप्न होतील सत्य
अथक परिश्रमाने त्या स्वप्नाचा
माग कधीच नाही सोडायचा..
