स्वप्न...
स्वप्न...
रात्री पाहिलेली स्वप्ने
दिवसा सत्यात उतरवायची,
परत दुसऱ्या दिवसाची स्वप्ने
रात्री झोपेत पहायची.
स्वप्नपूर्तीसाठी चक्र हे
असेच चालू ठेवायचे असते,
यशस्वी झाले नाही म्हणून
सोडूनही द्यायचे नसते.
स्वप्न पाहणे म्हणजे
पुढच्या कार्याला असते प्रोत्साहन,
आवाक्याबाहेरचे स्वप्न पाहण्यातच
असते खरे आव्हान,
कार्य सिद्धीस नाही गेले
तरी पुन्हा पुन्हा तेच गिरवायचे,
आणि ते सिद्धीस गेले की
अभिमानाने जगात मिरवायचे.
