Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

स्वप्न

स्वप्न

1 min
216


स्वप्न पडले

आज अचानक

पाही टकमक

डोळे दिपले...


या आयुष्याचे

सार्थक जाहले

दर्शन घडले

मज इशाचे ...


तो भगवंत

सामोरीच आला

जीव वेडा झाला

उरे न खंत ....


त्याच्या चरणी

मम लोटांगण

ठेंगणे अंगण

त्याची करणी ....


मज बोलला

सांग काय हवे ?

माग काहीं नवे

मोद जाहला ....


मन नाचले

 आनंदात आज

चढविला साज

तन नटले ....


दिले दर्शन 

कृतकृत्य झाले

मोदीत जहाले

केले नर्तन ....


नको मजला

श्रीमंतीचा थाट

दर्शनाची वाट

दावी मजला...


तुझे भजन

चिंतन करीन

चरणी घालीन

मी लोटांगण ....


जागी जाहले

मी त्या स्वप्नातून

मला मनातून

धन्य वाटले ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational