स्वप्न जे आज खरे झाले...
स्वप्न जे आज खरे झाले...
स्वप्न जे आज खरे झाले...
किती शब्द गोठवलेस तु ,
त्या वळणावर ,
तेव्हा असते वाहले,
शब्द ओठामधले ,
तर कदाचित ,
नदी खळाळली असती ...
रुणझुण रुणझुण ,
निनादत हसुन,
उंचावरूनी कोसळले,
झरा शुभ्र दूधाचा भासले,
उन्हाने बाष्प झाली जरी,
मेघ दाटूनी बरसले...
नशिबाला भार झाले,
तुनेच तुला सावरले,
रडत तुच होती ,
तरी उसवलेले श्वास ,
शेवटी तुच शिवले ,
उसासे टाकीत ,
प्रत्येक क्षण जगले ...
तुच ओंजळीत सावळून घेतले,
सांडलेले प्राक्तनाचे मोती,
गुफंता गळ्याभोवती ,
किती शोभून दिसले,
दुनियेने पाहिली सुंदर नक्षी,
तु हळूच बोलले ,
तुटले पण ना हरले ,
स्वप्न जे आज खरे झाले ...
