STORYMIRROR

Sarika Jinturkar

Inspirational

3  

Sarika Jinturkar

Inspirational

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर

1 min
198

वि.दा. सावरकरांचा जन्म झाला 

नाशिक पासून काही अंतरावर 

असलेल्या "भगूर "या ठिकाणी


भारतभूमी ही खुदकन हसली तेव्हा 

ब्रिटिशांचे काय खरं नाही आता, 

म्हणून आनंदानी

  

आईचे नाव राधाबाई वडील दामोदरपंत

 बालपणापासूनच देशावरती अपार प्रेम  

एक राष्ट्र एक संस्कृती 

मनी वसे हा भाव मंत्र  


पोवाडे लेख आणि कविता

 यांचा असे तुम्हाला ध्यास

जनजागृती करण्यासाठी

 टिळकांचा केला अभ्यास  


चिंतक, विचारक, उत्कट देशभक्त

 महान क्रांतिकारक 

 "स्वातंत्र्यवीर "उपाधीने सन्मानित 

 प्रखर हिंदू राष्ट्रवादी राजनेता

प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक तुम्हीच 


 कुसुमकोमल कवी नाटककार 

इतिहासकार साहित्यकार तेजस्वी लेखक  

भारताच्या अखंडतेचे प्रबळ पक्षधर तुम्हीच 


 तुम्ही टिळकांचा असे छावा

विदेशी कपड्यांचा निषेध तुम्ही केला 

 तुम्हासारख्या शूर वीरला पाहून काळा पाणीही ही रडला 

शतशः वंदन असे तुमच्या अलौकिक कार्याला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational