STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Inspirational

3  

.प्रमोद घाटोळ

Inspirational

स्वातंत्र्याचा लढा

स्वातंत्र्याचा लढा

1 min
2.2K

या क्रांतीच्या लढ्यामध्ये, लढले कितीतरी डाव

जागे झाले गाव सारे, जागे झाले गाव 


सडे शिंपण्या रक्ताचे हो

तयार कितीतरी मर्द

गोळी झेलण्या छाती वरती

आले लावूनी शर्थ

नाही मागितला भाव,लढले कितीतरी डाव..१


आणिक सोशीला तुरूंग त्यांनी

शरीरा वरती घाव

गळ्यात घालूनी फासावरती

माफीला न उरला वाव

तुम्हास दिधला गाव,लढले कितीतरी डाव..२


मातीच्या कणाकणांतून

इतिहासाच्या पानांमध्ये

स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर

हृदयाच्या स्पंदनांमध्ये

धडकत राहावे नाव,लढले कितीतरी डाव..३


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational