STORYMIRROR

Shubhangi M borse(pingle)✍️

Classics Fantasy Inspirational

3  

Shubhangi M borse(pingle)✍️

Classics Fantasy Inspirational

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य

1 min
199

स्वातंत्र्य

पारतंत्र्याचे

कवाडे मोडूनी

स्वातंत्र्याचा ध्वज फडकवू..


स्वातंत्र्य

समानतेचा

हक्क देऊनी

समान कायदा लागू करु....


स्वातंत्र्य

गरिब श्रीमंत

भेद विसरूनी

समान रेषेत आणू..


स्वातंत्र्य

गुलामगिरिची 

श्रृंखला तोडूनी

देशाला स्वतंत्र मिळाले...


स्वातंत्र्य

अन्यायाविरुद्ध

आवाज उठवूनी

अन्यायाला नष्ट करा...


स्वातंत्र्य

सर्व धर्म सहिष्णुता

 बंधुभाव एकात्मता

 सार्वभौमत्व टिकवून ठेवू....


स्वातंत्र्य

अंधारातून तेजाकडे

तेजाकडून तिमिराकडे

वाटचाल नव्याने करू...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics