STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Abstract

3  

Meenakshi Kilawat

Abstract

स्वार्थ भरला या जगी

स्वार्थ भरला या जगी

1 min
327

स्वार्थ भरला या जगी

स्त्रीलाच सारा पोळतो का?

देशसेवेच्या पथावरुनी पाय

धरुनी असा ओढतो का?।।


दाट येथे धूर येतो 

काळजाला भेदत असे

आसवांचा लोट वाहे 

कोळसा बनवत असे।।


फुल राहतो एकटा पण

पक्षी हा चोचिने तो टोचतोया

पाखरांना जीव हा कोणास 

ठावूक कशाला तो लावतोया।।

 

दुःख आता सोसण्याला 

कोठे नाही घेतली धाव तू 

जीवनाला या वाचवाया 

अंधश्रद्धापण मानतो तू।।


संशयाची धूळ डोळी

कोणती ही राजनीति

दुटप्पी ही धोरणे मग

संघवेत्ता पाळतो का?।।


दाटलेला धूर येथे 

काळजाला भेदत असे

आसवांचा लोट वाहतो अन्

कोळशाला झेलतो का?


मोहमायेचा स्वार्थ करूनी

कोण कामाला येत असे 

संतवाणी ऐकुनी ही कोणी

मी-पणा सोडत नसे।।


संशयाची धूळ डोळी 

कोणती ही राजनीति 

दुहेरी धोरणाची होतसे

इथे पायमल्ली किती।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract