STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

स्वामींचा ध्यास

स्वामींचा ध्यास

1 min
237

स्वामींचा ध्यास,

स्वामींची आस,

वाटे सदा मिळावा,

स्वामींचा सहवास


आले घेऊनी आस,

स्वामींचिया द्वारा,

स्वामी दर्शनाचा ध्यास,

करावयाला मी पुरा


ध्यास मनीचा होई पुरा,

करिता स्वामी चरणी प्रार्थना,

नामजप करू नित्य निरंतर,

करू स्वामींची पूजाअर्चना


ध्यास घेता गुरूचरणाचा,

होती पूर्ण मनोकामना,

टेकविता माथा चरणी,

अलौकिक शांती मिळे मना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational