स्वाभिमान
स्वाभिमान
आयुष्यात एकदाच जगायचं असतं,
आयुष्यात एकदाच मरायचं असतं.
जगण्याची आशा करू नये,
मरण्याची वाट पाहू नये.
आलेला प्रत्येक क्षणाचा उपभोग घ्यावा,
क्षणा क्षणात आनंद ओळखावा.
कुरवाळत बसण्यापेक्षा दुःखाला,
दुःखाचीच साथ द्यावी मनाला.
पाहुणे म्हणून आलेल्या सुखात,
दु:खाला विसरून जायचे आरामात.
गुंत्यात अडकताना समस्यांच्या,
परिपक्व करावे मनास विचारांच्या.
मनाला ताब्यात ठेवावे,
विचारांनी परिपूर्ण व्हावे.
समस्या वरच मात करावी,
सुख-दुःखाची संगत धरावी.
हजार वेळा मरण्याऐवजी स्वतःस सुधारावे,
स्वाभिमानाने एकदाच मरण पत्करावे.
