सूर्यफूल
सूर्यफूल
🌻🌻🌻🌻
उगवला नभी सूर्य
अंधारी रात्र कुठे गडप झाली
स्वागत करण्यास पहाटेचे
कोवळी कळी सूर्यफूलाची फुलली खांबावरी
गडद, केशरी, पिवळसर रंगाची
पिऊनी सोनेरी रविकिरणे
सूर्यमुखी होवूनी
आनंदाने डोलू लागली सूर्य फुले
नाद सुरांच्या तालावर
सोनसकाळ ही
कोकीळ मधूर कर्ण स्वर
पिवळे रंग शोभते गुलकंद पुप्षावर नितळ परागकण फुलपाखरांचे घर
सगळ्या फुलात वेगळे,सूर्यफूल
अद्भुत किमया ही निसर्गाची
प्रगती, तेज, ऊर्जा सारी प्रतीके तयाची
सूर्याच्या प्रखर किरणात
सृष्टीस ही फुले अधिक
सुशोभित करती
दैनंदिन जीवनात फार उपयोगी ठरती
निःस्वार्थ जगणं या सूर्यफूलाकडून शिकावं ....
सुखासहीत दुःखामध्येही तितकच बहरून यावं
क्षणभंगुर हे जीवन सतत आनंदी राहावं ....🙏😊
