सूर्यास्त
सूर्यास्त
अस्तांचलगामी भास्कर हा ,
सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघाला.
आभा त्याची तेजाळली ,
प्रभावलयात शोभून दिसला .
वनराईतून अलगद निघाला ,
रेखाटने वृक्षराजींची सुंदर .
शांत ,निरव वातावरणात ,
भासे प्रौढासारखी धीर गंभीर .
सुवर्णमयी प्रतिबिंब विलसते,
जलाशयाची शोभा वाढते .
विश्वकर्म्याने हातात धरली ,
कांडी जादूची स्थिरावते .
सुख-दुःखाचे स्मरण होते ,
तम-प्रकाशाचा पाहून खेळ .
जाईल निघून चुटकीसरशी,
आलेली क्लेशदायक वेळ .
अस्ताचा शेवट उदयानेच होतो,
स्मरणात नेहमी असते ठेवायचे .
आली संकटे जगी लाख तरीही,
आनंदाने हसत स्विकारायचे .
