STORYMIRROR

Sailee Rane

Tragedy

3  

Sailee Rane

Tragedy

सूर तुझे माझे

सूर तुझे माझे

1 min
488


लेक म्हणून आली पोटी

माय बाप नशीबा कोसी

पहिली बेटी धनाची पेटी

हे ठावं नव्हतं तयांसी


लेक झाली म्हणूनच

अवलक्षणी ठरली मी

तिथून नशिबाची चक्रे

फिरून अभागी झाली मी


हे जीवना तुला जगताना

सूर तुझे माझे जुळलेच नाहीत


शिक्षणाची माझ्या आबाळ

आईचा ठरले आधार

पाटी पुस्तकांचा हव्यास होई

पण शिकवण्याची नसे तयारी


जीवन जगायचे होते भारी

आईबापांची नव्हती तयारी

मुलीचं जगणं नकोसं झालं

लाजिरवाणे जगणं नशिबी आलं


हे जीवना तुला जगताना

सूर तुझे माझे जुळलेच नाहीत


आईबापाला झालंय ओझं

माझ्या रक्ताच्या नात्याचं

म्हणे करंटे आलीस आमच्या

पोटी नशीब फुटलं आमचं


म्हणे मुलगी झाली म्हणजे

जीवाला कायमचा घोर

मुलगा झाला असता तर

वंशाचा दिवा मिळाला थोर


हे जीवना तुला जगताना

सूर तुझे माझे जुळलेच नाहीत



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy