सूर सम्राज्ञी लता दिदि
सूर सम्राज्ञी लता दिदि
भूपाळी सूर ऐकूनी
प्रभात होते सकळजणांची
उठता बसता ऐकू येती
मधूर गाणी लताजींची
पुढे उभा मंगेश
मागे उभा मंगेश
लतादीदींचा स्वर श्वास
हरवले सूर बसेना विश्वास
अवघे विश्व वेडे
सूरात मंत्रमुग्ध बुडे
गीत सूरेल चंदन झाड
क्षणाक्षणाला स्मरण घडे
सप्तसूरांची सरस्वती
लतादीदी थोर महान
भारतरत्न सम्राज्ञी मान
अवघ्या विश्वाचा अभिमान
सोज्वळ शांत रुप, गेले हरवून
सूर सम्राज्ञी, अनंतात विलीन
आदरातिथ्य भावपूर्ण श्रध्दांजली
शब्द सुमन पुष्पांजली वाहून..
