सुटतय
सुटतय


खुप काही मिळताना, काही तरी नकळत सुटतय.
जिथं जोडल्या जातंय सगळं, तिथंच काही तरी तुटतय.
सुटणार काय की तूटणार काय, आता फक्त जाणवतंय.
मिळवताना मिळणाऱ्या सुखात, पुन्हा सगळ सावरतंय.
सावरलोय तो आता काही, फक्त तुझ्या येण्याने.
वेळ जात नव्हता काहीसा, दूर तुझ्या जाण्याने.
शेवटी सगळं सुटेल, राहतील त्या आठवणी.
अलगद मनात साठवलेल्या, मायेच्या साठवनी.
तिथ मिळणं मिळवणं, याला काही अर्थ नाई.
भावना आपुलकीची तेवढी असते, मृत्यूनंतर व्यर्थ थाई.