सुतार पक्षी
सुतार पक्षी
उगवला नभी सूर्य
रवी किरणांची
उमटली सोनेरी नक्षी
गावाजवळच्या रानमाळात दिसला आज मज सुतार पक्षी
डोक्यावर तुरा, चोच लांब
मजबूत व धारदार
झाडावर चढतांना
पकड त्याची घट्ट
पायांच्या बोटांची नखे ही अनकुचीदार
सुताराप्रमाणे अप्रतिम
त्याची कारागिरी झाडाच्या
खोडाला किंवा फांदीला पोखरून सुंदर घरटे बनवतो बघत रहावी अशी ही त्याची कलाकारी
प्रयत्न सोडू नका,
सुरुवात नेहमी कठीण
विश्वास असेल तर पाषाणातून ही
देखील पाण्याचा झरा फुटतो
कदाचित ही शिकवण सुतार पक्षी
आपल्याला देत असतील.... 🙏😊
