सुरूवात
सुरूवात
आज नव्याने पुन्हा जन्मलो, करण्या स्वप्न पुर्ण.
बाकी उरली होती जी काही, करण्या लवकर कर्म.
हाती लेखनी चालत होती, सांगण्या सर्व काही.
सगळं काही मांडत होतो, तरी बाकी खुप राही.
राहिले तर खुप काही, सगळं पूर्ण करनार.
भीती नक्कीच वाटते, तरीही काही राहणार.
प्रयत्न माझे चालू असतील, सगळ्या वाटा साठी.
थकलेल्या विचारांची, लेखनी एकच काठी.
लेखनी घेऊन हाती, शोधतोय एक वाट.
विचारांच्या आयुष्यात, हिच लिखानाची सुरवात.
