सुंदर माझे घर
सुंदर माझे घर
घर माझे प्रेम झरा
झुळझुळ वाहे नित्य
नको राग,नी मत्सर
एकमेका माया सत्य...१
गोकुळात नांदे दोघे
बाळकृष्ण, बलराम
हास्य येथे फुलविले
वाटे घर भक्ती धाम...२
सासू सासरे मायाळू
देते सौभाग्य आशीष
त्यांचे चरण कमल
ठेवी मज सदा खुश...३
जाऊ, नणंद नी दीर
प्रीत करी संकटात
संस्कारांचे बीज छान
घर वाटे आनंदात...४
घरी माझ्या स्वर्ग सुख
नशिबाने दिली साथ
नित्य मिळो सहवास
नाथ द्या हो हाती हात...५
