सुखदायी भविष्य
सुखदायी भविष्य
आज लावलेल्या छोट्या रोपाचे
उद्या डौलदार वृक्ष होईल
जगण्यासाठी अन्नपाणी आणि
सारेच काही तो देईल...
मिटतील सगळ्या चिंता व्याधी
सृष्टी पुन्हा बहरेल
पशुपक्षी अन मानवाला
नवसंजीवन मिळेल ...
नाही बिघडणार ऋतूचक्र मग
संपन्नता नांदेल सर्वत्र
बळीराजाही सुखावेल मग
थांबेल आत्महत्येचे सत्र ...
