सुखासाठी
सुखासाठी
सुख, दुःख भरलेले
माणसाच्या जीवनात
सुख भोगणे सोडतो
सदा राहतो दुःखात
जीवनात सुखासाठी
कवितेच्या जाऊ गावा
यात्रा भरते शब्दांची
आणि आनंद मेळावा
कवितेच्या जाऊ गावा
शोध सुखाचा घ्यायला
दुःख काळजामधले
तिथे रिते करायला
कवी कल्पनेच्या बळे
उभे शब्दांचे बंगले
कशी राहतील तिथे
दुःख कष्टाची जंगले
कवितेचे गाव छान
तिथे दुःखाला ना ठाव
वेदनांचे वेद, होई
उभा काळजात भाव
दृष्टी कवीची नेहमी
रवीच्याही पलीकडे
त्याने सुयोग्य बदल
कवी जीवनात घडे
