STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

सुजाण नागरिक

सुजाण नागरिक

1 min
380

नाळ माझी राज्याशी 

जोडली आहे इथे 

अधिकार माझा एक 

भारतीय नागरिकत्व हे 


हक्क आणि जबाबदारी 

शासनेचे सदस्यत्व 

करेन पालन नियमांचे 

समजून कल्याण महत्व 


टिकविण्यास समाजाचे 

स्वास्थ्य स्थैर्य सातत्य 

निर्माण करेन वातावरण 

हेच माझे परम सत्य 


करण्यास संरक्षण 

व्यक्ती तथा समाजाचे 

मानवजातीच्या हिताचे 

नेहमी असेन मी सर्वांच्या पुढे 


निष्ठा माझी शासनावर 

पालन करीन कायद्याचे 

स्व ते समाज विकास व्हावा

ध्येय राष्ट्राच्या विकासाचे 


सर्वात उत्तम व पवित्र 

संविधानाचा अजब ग्रंथ 

रोज पठण मनन करेन 

बनण्यास सुजाण नागरिक पंथ 


जरी भारत आहे लोकशाही 

मी एक भारतीय नागरिक 

शान मान वाढवेन भारताचा 

बनून कायद्याचा आज्ञाधारक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational