STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Abstract

4  

Dilip Yashwant Jane

Abstract

सुगंध

सुगंध

1 min
443

ढगांना झाले जड

थेंब जपून ठेवलेले

करुन वर्षाव अमृताचा

नाते प्रेमळ जोडलेले


क्षणात आले भूईवर

मेघ आभाळी जमलेले

सुखावला बळी राजा

स्वप्न रानी पेरलेले


हर्षित धरणी सारी 

लेऊन साज हिरवा

पाना पानात लपून

मधूर गातो पारवा


मंद सुगंध मातीचा

राना वनात दरवळला

अजब सारा मोद

सृष्टीत सारा भिनला



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract