सत्य
सत्य
सत्याच्या वाटेवर
काटे अमाप असती
चालुनी थकती पाय
प्रत्येका काटा टोचती
लाडी लबाडी करुनी
समजती स्वत: हुशार
सत्य स्थिती जाणता
होऊन जाईल पसार
चांगले कार्य करता
मिळे कर्माचे फळ
नदीचा तळ गाठता
कळे मनाचा तळ
नव्याने ओळख होते
केलेल्या प्रत्येक चुकीची
सुधारण्याची संधी येते
नवीन काही शिकण्याची
सत्य कडवट आहे
जाणीव सर्वा याची
मार्ग याचा एकच
हीच जाणीव सत्याची
