स्टोरी मिरर ची बात वेगळी
स्टोरी मिरर ची बात वेगळी
स्टोरीमिररची बात वेगळी
हा वैचारिक मंच आहे
कथा कविता कोट यांचा
सुंदर असा संच आहे ||0||
इतका सुंदर प्लॅटफॉर्म आम्ही
कधीच कुठे पाहिला नाही
इथे उपाशी लेखक कवी
कधीच मित्रा राहिला नाही
भूक मिटवी विचारांची
कलेत नवा क्रंच (Crunch) आहे ||1||
इथे संधी लेखकाला
इथे संधी कवीला
विचार झेप पाहून येथे
पडते कोडे रवीला
भावनेच्या छटा हजारो
आकर्षक हा बंच (Bunch) आहे ||2||
साहित्याच्या सेवेसाठी
प्रसिद्धीचा झोत आहे
मेंदूलाही खाद्य मिळते
कल्पनेचा स्रोत आहे
चालना मिळे मनाला
एक आगळा (Hunch) हंच आहे ||3||
सगळंच काव्य गोड नसतं
काही तिखट झोंबतं ही
डोळे मिटून बसणाऱ्यांच्या
मेंदूत सत्य कोंबतं ही
सत्य नाकारणाऱ्यांसाठी
दणदणीत हा (Punch) पंच आहे ||4||
