स्त्रीधर्म..
स्त्रीधर्म..
तुझ्या प्रेमाच्या सागरी
माय मला न्हाऊ दे..
नको मारू उदरी मला
जन्माला येऊ दे..
तुझ्या प्रेमाचा सागर
माझ्यासाठीच कसा आटला..
गर्भी मला चिरडतांना
तुझा कंठ नाही दाटला..
पोरगी आहे मी
यांत माझा काय गुन्हा..?
जन्म मला देऊन
तुझं बालपण पहा पुन्हा..
राखी बांधीन मी
माझ्या भावाच्या हाताला..!
टाकून देऊ नकोस
असं तूच तुझ्या अंशाला..
मला मारून माझ्या
भावाला बहीण कोठून आणशील..?
"लेक माझी गुणाची.."असं
लाडनं कोणाला म्हणशील..?
कन्यादानाशिवाय दुसरे
कोणतेही नव्हे पुण्यकर्म..
जन्माला घालून मला
जप तू तुझा स्त्री धर्म..
