स्त्रीची गाथा
स्त्रीची गाथा
स्त्रीची गाथा..
कधी ती खळखळून हसते ,
कधी ती मन भरून रडते..
राग आला की
गाल फुगवून ही ती बसते..
प्रत्येक घराला घरपण
हे स्त्री मुळेच असते..
कधी ती छोट्या, छोट्या
गोष्टींनी सुखावते
कधी ती खूप मोठ,मोठी
दुःखही लपवुन ठेवते..
प्रत्येक घराला घरपण
हे स्त्रीमुळेच असते..
कधी ती कुटुंबीयांच्या सेवेत तल्लीन होते ,
कधी खंबीरपणे जोडीदाराच्या
पाठीशी उभी राहते,
प्रत्येक घराला घरपण
हे स्त्रीमुळेच असते..
कधी ती जिद्द मनात बाळगून
परिस्थितीशी लढा देते ..
कधी त्यागाची मूर्ती बनून
शिकवण समाजाला देते..
प्रत्येक घराला घरपण
हे स्त्रीमुळेच असते..
