स्त्री
स्त्री
आयुष्यच असतं जणू तिचं,कसरतच तारेवरची
कर्मानं ठरली ‘ती’खरी,लक्ष्मी या धरणीची || धृ ||
आहे निराळे दु:ख तिचे,निराळ्याच यातना
दु:ख पहाडाएवढे तरीही,वाचा का फुटेना ?
आयुष्यभर तरी कुणाला वाटलंय घ्यावं ऐकुन
‘आवाज’दाबण्याचा विचारच फक्त,
येतो पुरुषी समाजातून...
बांधली सप्तपदीसोबत,गुलाम ‘ही’साऱ्या जन्माची || १ ||
त्यागाचे तिच्या कुणाला नाही कसे सोयरसुतक
अहंकाराच्या चौकटीत झाल्या,भावना माणसाच्या मिथ्य
सांभाळण्या कुटुंबास तिने,केलाच हो त्याग मोठा
सुखांसाठी आपल्यांच्या,केला जीवाचा आटापिटा
प्रेम दिलं ,दिले संस्कार ,’सर्वस्व’ही दिलं
गणना तरीही राहिली तिची ,फक्त गुलामातच
काय संपणार नाही कधी,दुर्दश्या हि जन्माची? || २ ||
इने घडविले राष्ट्र,संसार इने घडविला
बाबासाहेबाची आई ही,जन्म दिला शिवाजीला
श्रीविष्णूची प्राणप्रिया हि,महेशाची रणचंडीका
विध्वंसिले जिने जगती,दुष्ट,पापी,नराधमा,
कल्याणासाठीच तिने जन्म दिला ‘या’जगाला
उठतील बाहू लढण्या तिचे,तत्पूर्वी जागे व्हा रे... !
बनण्याआधी ज्वालामुखी,आग ही विझवा रे...!
प्रेमस्पर्शे होईल सुखी,लेकुरे सुखी आईची
आयुष्यच असतं जणू तिचं, कसरतच तारेवरची || ३ ||
