STORYMIRROR

Santosh Jadhav

Tragedy Inspirational Others

3  

Santosh Jadhav

Tragedy Inspirational Others

स्त्री

स्त्री

1 min
27.9K


बाईला अंगाखालचं खेळणं समजावं 

इतकं गडीपण तुझं हिजड्यागत वाटावं .

असंच कायतरी तू करत आलास 

अन् वासनेच्या किड्यागत आंबट झालास..

मर्दाची व्याख्या बाईला भोगून सांगशील

एवढं करूनच नपुसकत्व पाळलेली साक्ष देशील 

मनगटातली जोर वेश्येजवळ काढून

 जेव्हा तू येशील अंग अंग पिऊन 

तेव्हा उरलेला जोर बायकोवर काढताना 

तू जरासुध्दा जुमानत नाहीस ती नकार देताना .

दारूत झिंगल्याने तुझी अजून उफाळलेली वासना

मागत आलास पाप्या पैसे नसता भोग उसना.

समस्त स्त्री जातीलाच गुलाम म्हणवून 

तू हुकूमशाहीचा दाखवलास गुण 

तेंव्हा खालच्या मानेनं तुला सहन करताना 

पाहिलं तिला तिनेच आरशात तुझं कुंकू लावताना.

पाळीच्या कळा सोसना-या तिला कळा देणारा तू

 माणसात दैत्य जागवून तिला झळा देणाराही तू 

तू झाला नाहीस चांगला मुलगा , नवरा आणि भाऊ

आपण तिचा मान ठेवला तरच, मर्द माणूस होऊ

इसवी सन हे चुलीकडून गॅसकडे येऊन सुध्दा 

तुझ्यातला माणूस तिथंच आहे हा कळीचा मुद्दा.

मुद्दा काही का असेना , तू दृष्टिकोन बदल 

नाहीतर काळच शिकवेल तुला जन्माची अद्दल.

अख्खा स्त्री जन्मच नावावर करून 

तिला घरगडी म्हणून राबवत आलास 

अन् तिच्याच उदरातून बाहेर येऊन 

अख्ख्या दौलतीचा मालक झालास 

जगणं स्त्रीचं मातीमोल करणारा 

तू माणूस नराधम प्राणी 

तिच हागणं मुतनं काढते रे 

तुझ्याच पिकलेल्या म्हातारपणी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy