स्त्री
स्त्री
मी सुखाच्या सागरात ही
कोरडाच राहून गेलो
अन् ती सुखाच्या दवबिंदुनेही
चिंब होऊनि गेली
मला जगण्याची कला
कधी शिकताच आली नाही
अन् तिच्या सुखाची व्याख्या
मला कधी उलगडताच आली नाही
मी सतत धडपडत होतो
सारे मिळवण्याच्या हव्यासात
अन् ती शांत बसून पापण्यांनी
सारे सुख टीपत होती
मी रोजच्या जीवनाचे कोडे
सतत चुकवत होतो
अन् ती मात्र डोळ्यावर विश्वासाची पट्टी बांधून न चुकता वावरत होती
मी चिडून तिलाच विचारले
हे सारे सहज कसे जमते तुला
ती स्मित हास्य करत म्हणाली
त्यासाठी स्त्री व्हावे लागते
