STORYMIRROR

Vishal Puntambekar

Inspirational

3  

Vishal Puntambekar

Inspirational

स्त्री जन्माची हेटाळणी का होते

स्त्री जन्माची हेटाळणी का होते

1 min
28.2K


आई होऊन जन्म देते

पत्नी बनून साथ देते

बहीण पाठीशी घालते

मुलगी आनंदाचा वर्षाव करते

तरीही स्त्री जन्माची हेटाळणी का होते?


विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमठविते

तिच्या नेतृत्वाचे कौतुक सर्वत्र होते

संसाराचा गाडा समर्थपणे सांभाळते

प्रसंगी स्त्री-पुरुष दोन्ही भुमिका वठविते

तरीही स्त्री जन्माची हेटाळणी का होते?


कल्पना चावला बनून अवकाशात जाते

सावित्रीबाईंंच्या रुपाने प्रबोधन करते

जिजाऊंंच्या संस्काराने व्यक्तीमत्व घडते

प्रसंगी राणी लक्ष्मीबाई रणरागिणी होते

तरीही स्त्री जन्माची हेटाळणी का होते


देवीच्या रुपात घरोघरी पुजली जाते

प्रत्येकाला बायको/बहीण/सुन हवी असते

आईचे स्थान तर देवाच्या वर असते

तिच्या कर्तृत्वाने दैवी आविष्कार ठरते

तरीही स्त्री जन्माची हेटाळणी का होते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational