स्त्री ची महती
स्त्री ची महती
सृजनशील मनाची
संस्कृती जपणारी
दुर्गा शक्ती अवतारी
कणखर व मृदुल शब्दांची
घराला सावरणारी असते स्त्री.....!
आत्मीयतेने विचार करणारी
सत्त्याने पूर्णत्व आणणारी
सजीव व निर्जिव काळजी घेणारी
घराला सावरणारी असते स्त्री.....!
समारंभात नियोजित करणारी
राणी ती साम्राज्याची
संपेल काय ते आणणारी
सर्व कामात निपुण
खर्च तजविज करणारी असते स्त्री...!
बाह्य जगाशी जोडणारी
मायेच्या बंधनात गुंतणारी
प्रेमळ नात्यात राहणारी
असते ती आधार घराची
कुटुंबाचा कणा असते स्त्री...!
राब राब राबणारी
अन्नपूर्णा घराची
आजारात सर्वांवर लक्ष देणारी
सणांची परंपरा चालवणारी
संसारी अर्धांगीनी असते स्त्री....!
थाप असू द्या कौतुकाची
प्रेमाच्या दोन शब्दांची
नको हिरावू गोडी
आयुष्य जगण्याची
घरात शोभून दिसते ती स्त्री.....!
किती गावी
तुज़ी थोरवी
अंतराळात ही पृथ्वीवर तुझी किर्ती
रोषणाई दोन्ही घरी
जग देई सलामी असते ती स्त्री.....!
