STORYMIRROR

Smita Murali

Tragedy

2.1  

Smita Murali

Tragedy

स्त्री भ्रुण हत्या

स्त्री भ्रुण हत्या

1 min
7.5K


बोले गर्भ स्त्रीत्वाचा

ऐका माझी कर्म कथा

गर्भातच भेदभाव

हीच माझी खरी व्यथा


सौख्य लाभे संततीचे

आईबापा होई हर्ष

आस ज्यांना मुलग्याची

त्याच्या मनात संघर्ष


दैव पाहता परीक्षा

येई मुलगीच पोटी

पुन्हा नव्याने मुलाची

आईबापा हाव खोटी


लिंगभेद चक्र चाले

होई मग भ्रूणहत्या

सांगा स्त्रीगर्भ रुजावा

गर्भाशयी हो कोणत्या


नसे भ्रूणहत्या दोषी

आईबाप हेच फक्त

असो मुलगा मुलगी

दोन्ही असे त्यांचे रक्त


दोष माझ्या संस्कृतीचा

कन्या नसे सुरक्षित

भोग पाहता स्त्रियांचे

सदा स्त्रित्व उपेक्षित


हाक स्त्रीत्वाची स्त्रियांना

नको स्वतःचीच हत्या

गर्भ जपा स्त्रीभ्रुणाचा

फुंकू नका गं पणत्या


रुप आपले घेउनी

आला स्त्री जीव हा नवा

करा निर्धार मनाचा

हत्या भ्रुणांची थांबवा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy