STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

स्री

स्री

1 min
253

ऐका ही स्री जातीची कहाणी,

कोणीही करावी तिथे मनमानी


स्री म्हणजे साधन उपभोगाचे,

फक्त चूल आणि मूल यांचे


काम तिचे रांधा उष्टी काढा,

ती म्हणजे डोक्याला पीढा


मर्दानी लढली झाशीची राणी,

देश चालविला इंदिरा गांधींनी


कल्पना चावला उडाली आकाशी,

तरीही का असते ती नकोशी


होता जमाना असा कधीतरी,

बदलली आता दुनियादारी


घरातून बाहेर ती पडू लागली,

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावू लागली


घरकामातून तिने सुटका केली,

साऱ्याच क्षेत्रात बाजी मारून गेली


नका करू आव्हान तिच्या कर्तुत्वाला,

गरज तीचीच या साऱ्या जगाला


ती शिकली घरादाराची प्रगती झाली,

दारावर तीच्या नावाची पाटी आली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy