STORYMIRROR

Savita Kale

Inspirational

4  

Savita Kale

Inspirational

स्री एक प्रेरणा

स्री एक प्रेरणा

1 min
626

अनाथांची होऊन आई

चैतन्य आणिले जीवना

लाडक्या माई, सिंधुताई

सर्वांसाठीच एक प्रेरणा।। १।।


आयुष्य व्यापले निवडुंगाने

काटे बोचले खोलवरी

दुःख सारुनी, वेदना मारूनी

घेई पुन्हा नवी उभारी।। २।।


नाही शिक्षण, नाही शाळा

सुविचारांचा फुलवी मळा

वाचायचे मला 'वाचण्यासाठी'

छंद जीवाला लावे आगळा।। ३।।


परिस्थितीही होऊन वैरी

डंख असा जालीम करी

धैर्य असे ते अमृत भारी

विषाला तडीपार करी ।। ४।।


धैर्य असे, साहस हे असे

किर्ती ओलांडे समुद्र सात

हीच प्रेरणा घेऊन आपण

संकटांवर करावी मात।। ५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational