स्पर्श तुझा
स्पर्श तुझा
स्पर्श तुझा हवाहवासा वाटतो
श्वास तुझा माझ्या श्वासात भासतो
मिठीत घेता तुजला तुझ्यात सामावून जातो
प्रेमाने तुझ्या केसांची बट सावरतो
प्रिये प्रीतीचे गीत मी तुजसाठी गातो
रात्रीच्या चंद्रात तुला शोधतो
ओठांवर तुझा स्पर्श जाणवतो
मिलनाची वाट प्रिये मी पाहतो
तू कामिनी, तू साजणी
तुझ्याचसाठी रचतो ही प्रेम गाणी

