STORYMIRROR

Pranoti Markande

Inspirational

3  

Pranoti Markande

Inspirational

स्पर्धेतील आवाहन

स्पर्धेतील आवाहन

1 min
173

स्पर्धा! स्पर्धा! स्पर्धा!

या स्पर्धेच्या युगात माणूस होतो अर्धा.

जिंकण्यासाठी चढाओढ फार,

कस लागतो ज्ञानाचा पार.


पावलोपावली स्पर्धा असते,

आवाहन पेलायला क्षमता लागते.

आवाहन स्वीकारताच कसोटी सुरू,

काय करू आणि कसं करू?


जिंकणे नाही महत्वाचे,

स्पर्धेत उतरणे धैर्याचे.

जिंकला तर उत्तम आहे,

नाही जिंकला तर पुढची संधी वाट पाहे.


जिंकण्यासाठी स्पर्धा नको करू राहशील पाठी,

स्पर्धा कर स्वतःला पारखण्यासाठी.

आवाहन घ्यायला तयार रहा प्रत्येक स्पर्धेचे,

प्रत्येक स्पर्धेतून अवलोकन कर स्वतःचे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational