STORYMIRROR

vanita shinde

Tragedy

4  

vanita shinde

Tragedy

स्पर्धेसाठी

स्पर्धेसाठी

1 min
171

जन्म देऊनी माय पित्याने

दाखविले जग बाळाला,

जगण्याचे झाले सार्थक

अर्थ लाभला जीवनाला.


पाऊल टाकण्या धरुन बोट

शिकविले बापाने चालायला,

हात धरुनी न्यायचा मुलाला

शिकण्यास शाळेत सोडायला.


झिजला करुन हाडाची काडं

नाही दिली झळ लेकराला,

ढाल बनूनी असायचा तयार

थोपविण्या दु:खाच्या डोंगराला.


उच्च शिक्षणास मुलाच्या

पै पै जमविली करुनी काम,

दिवस रात्र नाही कळली

भविष्यासाठी गाळला घाम.


पोटचा गोळा शिकला खुप

शिकून झाला तो धनवान,

ज्या बापाने घडविले आयुष्य

त्याचीच त्याला ना राहिली जाण.


होईल आपला लाडका लेक

म्हातारपणीचा एक आधार,

पण बापाची अडचण पोराला

दाखविले त्यास वृद्धाश्रमाचे दार.


प्रेम,जिव्हाळा अन् माणुसकी

पैशापुढे लोक व्यर्थ समजती,

विसरुनी सारीच कर्तव्ये ती

नात्यांचे ना अर्थ उमजती.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy