सोयरा सुखाचा विसांवा
सोयरा सुखाचा विसांवा
सोयरा सुखाचा विसांवा भक्तांचा ।
विठोबा निजाचा मायबाप ॥१॥
कृपाळू दीनांचा पडिभर नामाचा ।
तोडर ब्रीदाचा साच तया ॥२॥
काया-मनें-वाचा संग करा त्याचा ।
अनंत जन्मांचा हरेल शीण ॥३॥
नामा म्हणे आम्हां दीनांचे माहेर ।
हरी निरंतर ना विसंबे ॥४॥