STORYMIRROR

Sunita Ghule

Inspirational

4  

Sunita Ghule

Inspirational

सोनसोहळा

सोनसोहळा

1 min
223

छत्रचामर डोईवरी

सप्त नद्यांचा जलाभिषेक

सोनसोहळा रायगडी

शिवरायांचा राज्याभिषेक।


शिवशंभोच्या साक्षीने

मावळ्यांनी सांडीले रक्त

प्रतिज्ञा स्वराज्याची सफल

रचले सुराज्याचे तख्त।


देशोदेशीचे राजे रजवाडे

हत्ती पालख्या झुली

सिंहासनावर विराजित

शिवरायांची सुवर्णतुली।


आनंद अवघ्या रयतेला

स्वराज्याचे स्वप्न झाले पूर्ण

जिजाऊंच्या नयनी आनंदाश्रू

शिवछ्त्रपती अवतीर्ण।


अस्मिता महाराष्ट्राची

शिवतेजाने झळाळली

मातृभूमीच्या उद्धाराला

जिजाऊंची कूस उजवली।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational