STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

सोनसकाळ

सोनसकाळ

1 min
125

हिरवे हिरवे तुरे दाटले

मृदुल कोमल पुष्पबनी

दवबिंदूही डोलू लागले 

नाच नाचूनी तयांवरी


पूर्वेला रविकिरणांची

 प्रभा पसरे दवबिंदूंवरी

किरण तोय मीलनानी

तुरे डोलती वा-यावरी


डोल डोलती दवबिंदूंसवे

सुमने हर्षभरे रानोवनी

मित्र प्रभाकर गाली हसे

लज्जित फुलराणी बघूनी


खेळ चाले रोज प्रेमाचा

मजा येई लपंडावातूनी

दिले दृढ आलिंगन पुष्पा

अतीव प्रेमे रविराजानी


खेळ प्रीतीचा निसर्गातला

पाहिला देवांनी स्वर्गातूनी

आशिष देती उभयतांना

नांदा सौख्यभरे म्हणूनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract