sarika k Aiwale

Fantasy


4  

sarika k Aiwale

Fantasy


सोनेरी दिवस

सोनेरी दिवस

1 min 227 1 min 227

ओझरती वाट पहात उभी,

पसरली स्वागता सूर्यकिरणे होऊन सोनेरी दवबिंदू,

आहे काय नाही काय हे सार नश्वर च

घे मना तू उंच भरारी सामावुन घे श्वासात तु वारं ही

फक्त मिटण्याची अनुभूती..

नसतं काहीच महत्वाचं..

या वळणावर पहा विसरून जग पुन्हा त्यानिसटल्या क्षणांना.

दु:ख ला घेऊन कवेत हसत कर स्वागत तु येणारं सुखात सुखावून घे..

विरून जातात काही भावना विरू दे

स्पर्श हळवी भाव कोवळी किरणे घे अंतरंगी सामावूनी

जे दिसेल ते असेल सत्य केवल सत्य जे उमगले ..

उमटले तुझ्या मन:पटलावर..स्मितहास्य

अनुभूती ती त्या तुझ्या मनातील प्रितीची

अभासी जगात ही निसटून जाणारी काही जाणिवेचा अंकुर

एक उदगम या निराश मनातील सोनेरी पहाटे चा

सोडूनी सार्या शंका कुशंका घे मोकळा श्वास..

काही क्षणातच आपलंस करून घे तू या नवकिरणांना..

अंतर्मनात भिनले ते सोनेरीकिरण

काय असत ,काय नसत,.. सगळं संपत..

सुटू पहाते काही सुटु दे ..

ऊभरती सोनेरी पहाट ही या अंतर्मनात ..

निराशेला आशेत बदल ..

हसत हसत सामोरं जावं जीवनातील प्रत्येक क्षणांना

प्रिय सारं कसं मनात सामावलं आहे..

तसंच जगातही सामावून जा तू बिनधास्त.. 


Rate this content
Log in

More marathi poem from sarika k Aiwale

Similar marathi poem from Fantasy