STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Classics

3  

Vaishnavi Kulkarni

Classics

सोड सखे पिंजरा

सोड सखे पिंजरा

1 min
383

मोकळे आभाळ तुला खुणावते आहे ,

एकदा तरी त्याच्याकडे बघ , 

टाक उंबर्याबाहेर पाऊल आणि

सोडून चौकटीचा पिंजरा स्वतःसाठी जग !

मनाच्या पिंजऱ्यात कोंडलेली स्वप्नं

जगण्यासाठी कर तू धडपड ,

बंदिस्त जीवन झुगारून तुला

आता जपली पाहिजे स्वतःची आवड ,

पिंजरा तो पिंजराच शेवटी असो

मढवलेला सोन्यात वा हिऱ्यात ,

स्वावलंबनाची ज्योत आता उजळू दे

तुझ्या आयुष्यरुपी मंदिराच्या गाभाऱ्यात !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics