सोबती
सोबती
मोडायला मन नाही, तोडायला शब्द नाही...
कथितरित्या सगळं संपलं, आता दाखवायला सुख नाही...
असं काही नाही सगळंच संपलं, अजूनही सार्थ उभा आहे...
परतीच्या वाटेला, सारखा आपला एकटक पाहे...
विसरून विरह येशील अशी, त्याच पाऊली परत...
पेटेल वणवा प्रेमाचा, जिथे आयुष्य चालले सरत...
सरला तर सरू दे की, साथ फक्त तुझी हवी...
विस्कटलेल्या स्वप्नात, पुन्हा तू माझीच व्हावी...
बाकी काही मागणे नाही, याचकाच्या मुखी...
तू सोबत असेल सतत, तर मी सदा सर्वदा सुखी...
